Shiv sena : लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळेंची नियुक्ती चुकीची, विनायक राऊतांचा दावा
शिंदे गटाने लोकसभा गटनेतेपदावर दावा करणार पत्र 19 जुलैला दिलं होतं. मग शेवाळेंची नियुक्ती 18 जुलै रोजी कशी झाली?, असा सवालही विनायक राऊत यांनी केलाय. कोर्टात जाणार असंही म्हटलंय.
नवी दिल्ली : लोकसभेच्या गटनेतेपदावरुन शिवसेना (shivsena) आणि शिंदे (Eknath Shinde) गटात पुन्हा एकदा वाद रंगला आहे. मात्र, यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर याचवेळी शिवसेनेकडून काही प्रश्न देखील उपस्थिती करण्यात आले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे (rahul shewale) यांची लोकसभेच्या गटनेतेपदी केलेली नियुक्ती केली आहे. ती नियुक्ती चुकीची असून हा शिवसेनेवर अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत (vinayak raut) यांनी केलाय. तर याचवेळी त्यांनी शिंदे गटाने लोकसभा गटनेतेपदावर दावा करणार पत्र 19 जुलै रोजी दिलं होतं. मग शेवाळेंची नियुक्ती 18 जुलै रोजी कशी झाली?, असा सवालही विनायक राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना जाब विचारणार असून सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याची राऊत यावेळी म्हणालेत.
Published on: Jul 21, 2022 11:20 AM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...

