Ramdas Athawale : शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते, रामदास आठवलेंची जोरदार टीका

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली

Ramdas Athawale : शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते, रामदास आठवलेंची जोरदार टीका
शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होतेImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:36 AM

मुंबई – रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आपल्या विधानामुळे नेहमी चर्चेत असतात. त्याचबरोबर ते त्यांच्या शैलीत इतर नेत्यांवरती टीका देखील करतात. राज्यातल्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) सरकार नवं स्थापन झाल्यानंतर त्याला कुठेतरी पुर्णविराम मिळेल अशी शक्यता होती. परंतु राजकीय घडामोडी काही थांबलेल्या नाहीत. महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज नव्याने नवे आरोप केले जात आहेत. आता रामदास आठवले यांनी संजय राऊत यांनी शिवसेना फोडली असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut)यांना राष्ट्रवादीसोबत जायचं असल्याने त्यांनी भाजप शिवसेनेची युती तोडली असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापण झालं नसतं. तसेच भाजप शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं.

शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली आहे. शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा देखील आठवले यांनी राऊत यांच्यावरती आरोप केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकारं आलं असतं असं देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रामदास कदम यांनी शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केलाय

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाविकास आघाडी कधीच तयार झाली नसती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार असतं. यापूर्वी रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप करत पवारांनी पक्षाला पद्धतशीरपणे संपवण्याचं काम केलं आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसला हे आमच्यापैकी कुणालाही मान्य नाही. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर सेनेकडे 10 आमदारही शिवसेनेचे राहिले नसते असे रामदास कदम म्हणाले होते. “मी 52 वर्षे पक्षात काम केले आणि शेवटी माझी हकालपट्टी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांचे मी आभार मानतो असंही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.