Big Breaking | व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही… संजय राऊतांनी बैठकीआधीच दिली महत्त्वाची माहिती; अखेरचा…
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना आता जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. याबाबत अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातील घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, बैठकीसाठी अनेक खासदारांना फोनवरून संपर्क करण्यात आला असून व्हॉट्सअपवरही संदेश पाठवण्यात आले आहेत. तसेच पक्षाकडून अधिकृत व्हीपही जारी करण्यात आला आहे.
संजय राऊत म्हणाले, “तुम्ही दाखवत असलेल्या बातम्यांनुसार आमच्याकडे 9 खासदार आहेत, पण ते 15 होतील असं वाटतं. आम्ही बैठकीसाठी जात आहोत. उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली, चर्चा केली आणि काही सूचना दिल्या. बेईमान करणाऱ्यांना फोडून टाकू”
दरम्यान, ठाकरे गटातील राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jun 18, 2026 10:55 AM
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या!लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष...
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?