बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा, लाखोंची गर्दी आणि सळसळता उत्साह, दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. पाहा...
मुंबई : दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर (Shivsena Dasara Melava Teaser) प्रदर्शित झाला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनों आणि मातांनो…, हाी त्यांची भाषणाची सुरूवात यात दाखवण्यात आली आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान…, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

