AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 तासांच्या मंथनानंतर सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम काकडेंनाच उमेदवारी, असं काय घडलं?

4 तासांच्या मंथनानंतर सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम काकडेंनाच उमेदवारी, असं काय घडलं?

| Updated on: Jun 01, 2026 | 1:26 PM
Share

सध्या राज्यभरात विधान परिषदेचीच रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादीत मोठी घडमोड पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या विधान परिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. कोकण आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे.

सध्या राज्यभरात विधान परिषदेचीच रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादीत मोठी घडमोड पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या विधान परिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. कोकण आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. कोकणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे असणार आहेत. तर पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीत अजून माथापच्ची सुरू होती. सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. दुपार झाली तरी नाव फायनल होत नव्हते. अखेर चार तासाच्या माथापच्चीनंतर विक्रम काकडे यांचे नाव फायनल झाले आहे. काकडे हेच राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार असणार आहेत.

पुण्यातील जिजाई बंगल्यावरती सकाळी नऊ पासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार राष्ट्रवादी पदाधिकारी यांची सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू होती. विक्रम काकडे यांना तिकीट देण्यास सर्वांचा विरोध होता. अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, या सर्वांची मनधरणी करण्यात सुनेत्रा पवार यांना यश आलं आहे. सुनेत्रा पवार यांनी अखेर काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काकडे यांनीही राष्ट्रवादीत तात्काळ प्रवेश घेतला आहे. विक्रम काकडे यांच्या संजय काकडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील एका जागेचा तिढा सुटला आहे. तिकीट मिळताच काकडे यांनी मी अर्ज भरायला निघाल्याची प्रतिक्रिया देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Published on: Jun 01, 2026 01:26 PM

Follow Us