सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असून अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. काही भेटींना राजकीय पार्श्वभूमी असते, तर काही भेटी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट पूर्णपणे कौटुंबिक कारणासाठी झाली होती.
सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या मुलगी रेवती सुळे हिच्या लग्नाचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या भेटीची चर्चा आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
Published on: May 23, 2026 03:12 PM
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब