“मुलींची सुरक्षा करण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी”, चर्चगेट वसतीगृहाती प्रकरणावर सुप्रिया सुळे यांची टीका
चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.शासकीय इमारतीमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही सारख्या सुविधा बसवल्या पाहिजेत. हॉस्टेलसारख्या ठिकाणी मुलींच्या रूममध्ये अलार्म बेल लावायला हवेत. जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो तेव्हा कायमच अशा गोष्टी कशा घडतात? सर्व ठिकाणी असं कस होऊ शकतं ? लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. मुलींची सुरक्षा करण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. दिल्लीमध्ये कुस्तीपटुंची भेट घ्यायला अनुराग ठाकूर तयार झाले आहेत. ही चांगली बाब आहे, पण हे सर्व भाजपचं अपयश आहे एवढं नक्की. कुस्तीवीरांना एवढं आंदोलन का कराव लागलं हे भाजपने पाहावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Published on: Jun 07, 2023 03:52 PM
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
