नाशकात सावरकरांवरून शिंदे गट विरिद्ध ठाकरे गट आमने सामने; ‘आम्ही सारे सावरकर’ बॅनर
सावरकरांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी केली आली आहे. ज्यावर आम्ही सारे सावरकर असा मजकूर छापण्यात आलेला आहे
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यात भाजप उरती आहे. भाजपकडून सावरकरांच्या समर्थनार्थ सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. बोरवलीमधून सुरू होणारी ही यात्रा 288 मतदार संघांमध्ये पोहोचणार आहे. याचदरम्यान सावरकर वाद हा नाशिकमध्ये उफाळून येण्याची शक्यता आहे. येथे सावरकरांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
सावरकरांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी केली आली आहे. ज्यावर आम्ही सारे सावरकर असा मजकूर छापण्यात आलेला आहे. तर काँग्रेसचे नेते मनी शंकर अय्यर यांच्या पुतळ्याला स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जोडे मारताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सावरकरांचा अपमान करत असताना संजय राऊत हे मात्र त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत असल्याचे दाखविण्यात आले आहे. युवा सेनेच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. हेच खरे गद्दार, यांनीच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली अशा स्वरूपाचे बॅनर सध्या नाशिकच्या प्रमुख भागामध्ये झळकत आहेत.
Published on: Mar 29, 2023 10:34 AM
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
