पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई केली जावी या मागणीसाठी शनिवारी बीड येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज सोमवारी बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे सकल मराठा समाजाने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी तरुणाचा पोलिस कोठडीतील मृत्यू या प्रकरणाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. शनिवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा निघाल्यानंतर आज सोमवारी बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे सकल मराठा समाजाने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला मोठी गर्दी झालेली आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि कुटुंबिय सहभागी झाले आहेत. आपल्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज असल्याचे वक्तव्य वैभवी देशमुख यांनी केले आहे. या दोन्ही हत्याच्या प्रकरणात आरोपी कोणीही असोत त्यांच्या पदांची पर्वा न करता या प्रकरणात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा

