Nashik School Case | प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्…! शिक्षकाचा घृणास्पद कारनामा उघड
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रदर्शन दाखवण्याच्या बहाण्याने बाहेर नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचबरोबर संबंधित विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ चित्रीत करून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती समोर येताच विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी मन्सूर सादिक मणियार या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यूंचं सत्र सुरूच असल्याचं चित्र आहे. नेर तालुक्यात एका 5 वर्षीय चिमुकल्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महागाव तालुक्यातील फुलसावांकी येथे आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले
उन्हाच्या तडाख्यात आमरण उपोषण… जरांगे पाटील ठाम! आश्वासनांना थेट नकार
मारूतीचं दर्शन घेतलं... मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले...