पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे यांनी पान मसाला जाहिरातींवरच्या कारवाईला उशीर झाल्याचे मान्य केले आहे. याबाबत बोलताना मुंढे म्हणाले की, ‘कारवाईला उशीर झाला असला तरी आता योग्य पाऊल उचलत आहोत.’ ग्राहकांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कायदा २०११ चा असून जाहिरातींसंबंधीचे नियम २०१८ मध्ये आले आणि त्यांची अंमलबजावणी जुलै २०१९ पासून सुरू झाली. यानंतरही, या […]
तुकाराम मुंढे यांनी पान मसाला जाहिरातींवरच्या कारवाईला उशीर झाल्याचे मान्य केले आहे. याबाबत बोलताना मुंढे म्हणाले की, ‘कारवाईला उशीर झाला असला तरी आता योग्य पाऊल उचलत आहोत.’ ग्राहकांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कायदा २०११ चा असून जाहिरातींसंबंधीचे नियम २०१८ मध्ये आले आणि त्यांची अंमलबजावणी जुलै २०१९ पासून सुरू झाली. यानंतरही, या काळात पान मसालाच्या जाहिरातींवर कारवाई होण्यास निश्चितच उशीर झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंढेंनी पुढे सांगितले की, ‘आता यावर आम्ही योग्य कारवाई करत आहोत.’ जारी केलेल्या नोटीसमध्ये सहभागी कलाकारांना १० लाखांपर्यंत दंड लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. पान मसाला हा कलम ३० अंतर्गत प्रतिबंधित पदार्थ (Prohibited Item) असल्याने, त्यावर कठोर नियम लागू होतात. तसेच, तो आरोग्यासाठी असुरक्षित (Unsafe) असल्याचे सिद्ध झाल्यामुळे कलम ५९ अंतर्गतही कारवाई केली जाईल. उशीर झाला असला तरी, आता या बेकायदेशीर आणि हानिकारक जाहिरातींवर कायद्यानुसार कठोर पाऊल उचलले जात असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे अशा उत्पादनांच्या जाहिरातींना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
Published on: Aug 18, 2026 08:30 PM
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची

