AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tuljapur | तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

Tuljapur | तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

| Updated on: May 29, 2026 | 4:54 PM
Share

तुळजापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या कथित मटका व्यवसायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूर बसस्थानकाच्या मागील मुख्य रहदारीच्या परिसरात हा मटका बाजार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून संबंधित व्हिडिओमुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

तुळजापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या कथित मटका व्यवसायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूर बसस्थानकाच्या मागील मुख्य रहदारीच्या परिसरात हा मटका बाजार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून संबंधित व्हिडिओमुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील भागात खुलेआम मटका सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हा परिसर नेहमीच नागरिक आणि प्रवाशांनी गजबजलेला असतो. अशा ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलिसांकडून या व्हिडिओची पडताळणी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने जातो आणि मटका व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: May 29, 2026 04:53 PM

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट;  IMD चा मोठा इशारा.

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?.

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?.

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?

Horoscope Today 18th July 2026 : सध्याचा काळ कठीण असला तरी लवकरच होणार बदल, या 3 राशींना मिळणार सुखद सरप्राईज...

Horoscope Today 18th July 2026 : सध्याचा काळ कठीण असला तरी लवकरच होणार बदल, या 3 राशींना मिळणार सुखद सरप्राईज..

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन.

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन