AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhosale on Ajit Pawar | उदयनराजे भोसले यांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर, पहा व्हिडीओ

Udayanraje Bhosale on Ajit Pawar | उदयनराजे भोसले यांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर, पहा व्हिडीओ

| Updated on: Jun 17, 2022 | 8:55 PM
Share

माझ्या गाडीचे टायरच दोन लाखांचे आहेत. मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन. वेळ पडली तर भीक मागेन पण खंडणी मागण्याचं काम करणार नाही.

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Satara MP Udayan Raje Bhosale) हे त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे जाणले जातात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे देखील मनात काहीही न ठेवता कोणताही मुलाहिजा न बाळगता बोलून जातात. याच दरम्यान अजित पवार यांनी साताऱ्यातील माण तालुक्यात झालेल्या सभेत खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना त्यांच्यावर आरोप केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना खासदार उदयन राजे यांनी दम असेल तर येथे या आणि बोला असं म्हटलं आहे. तर खंडणी (ransom) मागायला काय मी चिंधीचोर वाटलो काय? असा सवाल केला. तसेच ते म्हणाले, नखातली घाण काढून जगणारे आम्ही नाही. माझ्या गाडीचे टायरच दोन लाखांचे आहेत. मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन. वेळ पडली तर भीक मागेन पण खंडणी मागण्याचं काम करणार नाही.

 

Published on: Jun 17, 2022 08:55 PM