AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....

INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले….

| Updated on: Jun 09, 2026 | 9:55 AM
Share

देशातील विरोधी पक्षांची INDIA आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे राजकीय लढाई लढताना दिसत आहे. मात्र, INDIA आघाडीची स्थापना होऊनही अद्याप आघाडीचा अधिकृत समन्वयक किंवा प्रमुख चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील विरोधी पक्षांची INDIA आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे राजकीय लढाई लढताना दिसत आहे. मात्र, INDIA आघाडीची स्थापना होऊनही अद्याप आघाडीचा अधिकृत समन्वयक किंवा प्रमुख चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत INDIA आघाडीला सक्षम आणि प्रभावी समन्वयकाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. विविध पक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आणि जनतेसमोर आघाडीची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी एक मजबूत नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर जाण्यापूर्वी INDIA आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहराही स्पष्ट करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. जनतेला नेतृत्वाबाबत स्पष्टता मिळावी आणि आघाडीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. INDIA आघाडीचा समन्वयक आणि संभाव्य पंतप्रधानपदाचा चेहरा याबाबत आगामी काळात कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 09, 2026 09:55 AM

Follow Us
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर.

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग...

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..