AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?

सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं…शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?

| Updated on: Jun 17, 2026 | 7:01 PM
Share

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत असत आहेत. अशातच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत असत आहेत. अशातच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे 9 पैकी थेट 6 खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. आता यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत दगाबाजी करणाऱ्या खासदारांना सुनावले आहे. यावर आता शिवसेनेतील ज्योती वाघमारे यांनी नाव न घेता आक्रमक पवित्रा घेतला असून थेट फोडून टाकणार असा इशारा दिला आहे.

सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्हाला भावासारखं वागवलं. बाळासाहेबांनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोकं कोण जातात हे, डोन्ट कट. कट मत करना हे बेईमान लोक आहे. हे बेईमान आहेत. त्यांच्या रक्तात बेईमानी आहे. मी कोणत्या पार्टीचं आणि व्यक्तीचं नाव घेत नाही. सध्याच्या लोकशाही व्यवस्थते, आयोग, सुप्रीम कोर्ट आणि लोकसभा अध्यक्षांची काय हैसियत आहे माहीत आहे.”

यावर आता ज्योती वाघमारेंनी थेट इशारा दिला आहे त्या म्हणाल्या, ‘तोड सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं, हे शिवसैनिकांना चांगलं माहिती’.

Published on: Jun 17, 2026 07:01 PM

Follow Us