Vaishnavi Hagwane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण; लग्नात अजित पवारांचीही होती उपस्थिती
Anil Kaspate : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी आणखी एक खुलासा झाला आहे. वैष्णवीच्या वडिलांनी अजित पवार स्वत: या लग्नात आलेले असल्याचं सांगितलं आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते, असं अनिल कसपटे यांनी सांगितलं आहे. फॉरचुनर तुम्ही दिली की त्यांनी मागितली, असं देखील त्यावेळी अजितदादांनी विचारलं होतं, अशी माहिती वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी दिली आहे. वैष्णवीचे सासरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या गटाचे पदाधिकारी आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला शशांक हगवणेला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती. विशेष म्हणजे या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीविषयी विचारणा केल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे.
Published on: May 21, 2025 03:42 PM
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
