Dharmendra Passes Away : शोलेचा विरू कालवश…अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. देसी ही-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर घरीच उपचार सुरू होते. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. मध्यंतरी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांच्या घरीच एक वैद्यकीय युनिट तयार करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी माहिती दिली जात होती. धर्मेंद्र यांना देसी ही-मॅन या नावानेही ओळखले जात असे.
पंजाबमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये आपले एक खास स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची पुष्टी आयएएनएस वृत्तसंस्थेने केली आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

