AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana | ...अन् देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढली हे बरे नाही, सामनातून केंद्रातील नेतृत्वावरच हल्लाबोल

Saamana | …अन् देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढली हे बरे नाही, सामनातून केंद्रातील नेतृत्वावरच हल्लाबोल

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Oct 09, 2023 | 12:33 PM
Share

VIDEO | कपॅसिटी असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले आणि कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या केलं, पण या कपॅसिटीचा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना का लागू नये? सामनातून केंद्रातील नेतृत्वालाच केला सवाल?

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | देवेंद्र फडणवीस यांच्या कपॅसिटीचा शोध नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना का लागू नये? असा सवाल मोदी आणि शहांना करत सामनातून टीका करण्यात आली आहे. कपॅसिटी असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली आणले, असा घणाघातही समानातून करण्यात आलाय. फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही, असे म्हणत थेट सामनातून हल्लाबोल केलाय. तर फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय? असा सवालही सामनातून केलाय.

Published on: Oct 09, 2023 12:33 PM
Follow Us