औरंगजेबाचे फोटो घेऊन युवकाचा डान्स, व्हिडीओ व्हायरल; कुठलाय धक्कादायक प्रकार?
VIDEO | संदल उरूस उत्सवादरम्यान घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल
अहमदनगर : अहनदनगरमध्ये काल एक अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे. संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर येत आहे. तरुण औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचले असल्यामुळे यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

