AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये सर्वात धक्कादायक प्रकार, उरूसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणाचा डान्स, Video व्हायरल

अहमदनगरमध्ये काल एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.

अहमदनगरमध्ये सर्वात धक्कादायक प्रकार, उरूसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणाचा डान्स, Video व्हायरल
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 05, 2023 | 3:14 PM
Share

अहमदनगर : राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका असणार आहेत. तसेच पुढच्यावर्षी आधी लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात नेमकं काय-काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात प्रचंड हालचाली घडत आहेत. असं असताना अहनदनगरमध्ये काल एक अतिशय विक्षिप्त प्रकार समोर आला. अहमदनगरमध्ये काल एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर येत आहे. तरुण औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचले असल्यामुळे यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

ती व्यक्ती एमआयएमची?

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. पण जलील आणि एमआयएम यांचं औरंगजेबाबद्दलचं प्रेम लपून राहिलेलं नाही. कारण एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळी जात पुष्पहार अर्पण करत नमस्कार केला होता.

संबंधित घटनांनंतर वारंवार अशा घटना घडत आहेत. आतादेखील अहमदनगरमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो झळकवून नाचण्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आलाय. ज्या युवकाने हातात औरंगजेबाचा फोटो धरलाय तो एमआयएमचा शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगरमधील या घटनेमुळे शहरातील वातावरण तापलं आहे. प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेतली आहे. प्रशासनला घटनेचं गांभीर्य माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराभवासाठी औरंगजेब आला होता. औरंगजेब किती क्रूर होता हे सर्वाश्रूत आहे. त्याने आपल्या सख्ख्या भाऊ आणि वडिलांना सोडलं नव्हतं. पण तरीही त्याच्याबाबत काही लोकांच्या मनात इतका पुळका का आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

‘कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही’, फडणवीसांची प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाचं फोटो झळकवणं सहन केलं जाणार नाही. औरंगजेबाचं फोटो कोणी झळकवत असेल तर ते मान्य केलं जाणार नाही. या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Follow Us
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार