AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमआयएमची उमेदवार यादी जाहीर, ‘वंचित’सोबतच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह कायम

सोलापुरातील सांगोला मतदारसंघातून एमआयएमने अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूल शब्दी, सोलापूर दक्षिण मधून सुफिया तौफिक शेख, तर पुणे कँटोनमेंट मधून हीना शफिक मोमीन यांना रिंगणात उतरवलं आहे.

एमआयएमची उमेदवार यादी जाहीर, 'वंचित'सोबतच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह कायम
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 22, 2019 | 6:40 PM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसतानाच एमआयएमने आपली उमेदवार यादी (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List) जाहीर केली आहे. पुणे कँटोनमेंट, सांगोला, सोलापूर मध्य आणि दक्षिण या चार मतदारसंघातून एमआयएमने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

सोलापुरातील सांगोला मतदारसंघातून एमआयएमने अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूल शब्दी, सोलापूर दक्षिण मधून सुफिया तौफिक शेख, तर पुणे कँटोनमेंट मधून हीना शफिक मोमीन यांना रिंगणात उतरवलं आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या संमतीने ही उमेदवार यादी (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List) जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे. आतापर्यंत एमआयएमने सात उमेदवार जाहीर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात ‘आप’ने आपल्या उमेदवाराची घोषणा याआधीच केली होती. मुस्मिल बहुल असलेल्या या मतदारसंघात ‘आप’ने अॅडव्होकेट खतीब यांना उमेदवारी निश्चित केली आहे. एमआयएमकडून फारुक शब्दी रिंगणात उतरत आहेत. सोलापूर दक्षिणमधून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात सुफिया तौफिक शेख मैदानात असतील.

एकाच मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे अकरा वेळा निवडून येण्याचा मान पटकावणारे शेतकरी कामगार पक्षाचे 93 वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांच्याविरोधात अॅड. शंकर भगवान सरगर निवडणुकीला उतरणार आहेत. शेकापचे अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यंदा ते निवडणूक लढवणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे.

एमआयएमकडून पुन्हा एकदा वंचितसोबत आघाडीचे संकेत

एमआयएमची उमेदवार यादी (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List)

253. सांगोला (सोलापूर) – अॅड. शंकर भगवान सरगर 249. सोलापूर शहर मध्य – फारुक मकबूल शब्दी 251. सोलापूर शहर दक्षिण – सुफिया तौफिक शेख 214. पुणे कँटोनमेंट – हीना शफिक मोमीन (अनुसूचित जातींसाठी राखीव)

विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास अशी लढत होईल

पुणे कँटोनमेंट – दिलीप कांबळे (भाजप) vs हीना शफिक मोमीन (एमआयएम) सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs फारुक मकबूल शब्दी (एमआयएम) सोलापूर शहर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप) vs सुफिया तौफिक शेख (एमआयएम) सांगोला – गणपतराव देशमुख (शेकाप) vs अॅड. शंकर भगवान सरगर (एमआयएम)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.

Follow Us
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर