AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा भाजपच्या वाटेवर?

नमिता मुंदडा यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे चिन्ह किंवा शरद पवारांचा फोटोही (Namita Mundada Facebook post) दिसत नाही.

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा भाजपच्या वाटेवर?
| Updated on: Sep 22, 2019 | 9:44 PM
Share

केज (बीड) : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये जाहीर केलेल्या पाच उमेदवारांपैकी एक म्हणजे नमिता मुंदडा. नुकतंच नमिता यांनी एक फेसबुक पोस्ट (Namita Mundada Facebook post) केली आहे. या फेसबुक पोस्टमधून नमिता यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे चिन्ह किंवा शरद पवारांचा फोटोही (Namita Mundada Facebook post) दिसत नाही. त्यामुळे नमिता मुंदडा भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

“स्व.डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांनी गेली 25 वर्षे लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्य दिले, मतदारसंघातील प्रत्येकाशी कौटुंबिक नाते निर्माण करून थेट संपर्क ठेवला. पण मार्च 2012 मध्ये ताई आपल्यामधून अचानक निघून गेल्या. मागील 7 वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने कुठलेही पद नसताना लोकांच्या हितासाठी काम सुरू ठेवले. हेच नाते आता मला पुढे कायम ठेवून, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती,” अशी पोस्ट नमिता मुंदडा यांनी केली आहे.

मात्र या पोस्टमध्ये कोणत्याही नमिता मुंदडा यांच्याशिवाय कोणत्याही पक्षातील नेत्यांचा फोटो किंवा चिन्ह दिसत नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार यांनी बुधवारी (16 सप्टेंबर) बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची (Sharad pawar) घोषणा केली होती. यात नमिता मुंदडा यांचा समावेश होता. नमिता मुंदडा या दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. शरद पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती.

राष्ट्रवादीत असताना मुंदडा कुटुंबाचे वेगळे अस्तित्व टिकून होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधीच पटले नाही. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद असली तरी हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये राष्ट्रवादीला गळती लागली आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.