द्राक्षांच्या तीन वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक उत्पादन वाढ, पुढील महिन्यात द्राक्षांची स्थिती कशी असणार?

नाशिक जिल्ह्यात काही महिन्यांपासून थंडीचा जोर कायम आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांमध्ये गोडी उतरण्याचे प्रमाण काही अंशी मंदावले आहे.

द्राक्षांच्या तीन वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक उत्पादन वाढ, पुढील महिन्यात द्राक्षांची स्थिती कशी असणार?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 11:08 AM

नाशिक : द्राक्ष पंढरी म्हणून जगभरात नाशिकची ओळख आहे. पण यंदाच्या वर्षी युरोपियन बाजारपेठ जमेची बाजू असली तरी दुसरीकडे द्राक्षात गोडी उतरण्यासाठी फेब्रुवारीची वाट पाहावी लागत आहे. यंदाच्या वर्षी पावसाची ये-जा बघता द्राक्ष हंगामाला तसा पंधरा ते वीस दिवस उशिरच झाला होता. मात्र थंडीचा जोर कायम असला तरी दुसरीकडे उन्हाचा तडाखा चांगला असल्याने फुगवन चांगली झाली आहे. काही ठिकाणी द्राक्षात गोडी उतरायला तसा कालावधी बाकी असला तरी 20 टक्क्यांनी द्राक्षाचे उत्पादन अधिक होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. द्राक्ष बागांच्या अभ्यासकांनी वर्तविलेला यंदाच्या वर्षी खरा ठरत असून युरोपियन बाजारपेठेत नाशिकच्या द्राक्षांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नाशिकचा द्राक्ष यंदाच्या वर्षीय नंबर वन ठरत असून मागणीत वाढ झाली आहे. परिणामी उत्पादनातही 20 टक्क्यांनी वाढ असल्याने देशातही नाशिकच्या द्राक्ष चाखायला मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यात काही महिन्यांपासून थंडीचा जोर कायम आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांमध्ये गोडी उतरण्याचे प्रमाण काही अंशी मंदावले आहे.

ज्या द्राक्ष मण्यांत साखरेचे प्रमाण कमी आहे त्यांची निर्यात करू नये असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाकडून केले जात आहे. त्याचा फटका संपूर्ण बाजाराला बसत असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

युरोप सारख्या देशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होत असतो. मागणीही यंदाच्या वर्षी अधिक आहे. मात्र घाईने द्राक्ष पाठविण्याच्या धावपळीत आंबट द्राक्ष पाठवू नका असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघ करीत आहे.

कृशी विभागानेही साखर तपासणी करूनच द्राक्षाची निर्यात करावी अशी मागणी केली जात आहे. यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात पावणेदोन लाख, तर राज्यात जवळपास चार लाख एकरावर द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे.

द्राक्ष काढणीला काहीसा विलंब होत असल्याने निर्यात काही अंशी मंदावली आहे, त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम आता फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. दरम्यान याचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना साधारणपणे एकरी पाच हजार रुपये इतका बसला आहे.

युरोपमध्ये 105 रुपये सरासरी किलोला भाव मिळत आहे. तोच भाव रशियामध्ये मागील वर्षी 80 रुपये सरासरी मिळाला होता. यामध्ये दुबईत तर काळ्या द्राक्षाला 135 रुपये किलो सरासरी भाव मिळत असून सफेद द्राक्षाला 100 रुपये किलोला भाव मिळत आहे

Non Stop LIVE Update
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.