परवा जप्ती, काल भेट अन् लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
गेल्या महिन्यापासून शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील हे माढा आणि लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होते. त्यादरम्यान सभा सुरू असतानाच कारखान्यावर जप्ती आली. ३९ कोटींच्या साखरेच्या पोत्यांसह त्यांचा कारखाना सील झाला. कारवाईनंतर अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला...
पंढरपुरात अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावर झालेल्या जप्तीच्या कारवाईची सध्या सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. महाविकास आघाडीचा प्रचार करणारे अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे सूर काहिसे बदलल्याचे पाहायला मिळाले. पाटलांच्या माहितीनुसार, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं. पाटलांचे सूर बदलण्याचे कारण आहे, साखर कारखान्यावर आलेली जप्ती….पंढरपुरमध्ये विठ्ठल सहकारी कारखाना आहे. त्याचे चेअरमन अभिजीत पाटील आहेत. २०२१ साली कर्ज थकवल्याप्रकरणी कारखान्याविरोधात खटला भरला गेला. तेव्हापासून गेल्या शुक्रवारपर्यंत कारवाईवर स्टे होता. गेल्या महिन्यापासून शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील हे माढा आणि लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होते. त्यादरम्यान सभा सुरू असतानाच कारखान्यावर जप्ती आली. ३९ कोटींच्या साखरेच्या पोत्यांसह त्यांचा कारखाना सील झाला. सभा सोडून ते कारखान्याच्या दिशेने गेले. दोन दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबच अभिजीत पाटलांची भेट झाली बघा नेमकं काय झालं भेटीत?
Published on: Apr 30, 2024 10:27 AM
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
