पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदीचे हे आहे कारण, वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर

Patanjali Products Ban : पतंजली आयुर्वेद विषयी भ्रामक जाहिरातीप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सोमवारी उत्तराखंडच्या औषधी विभागाने कोर्टात एक शपथपत्र दाखल केले आहे. त्यानुसार पतंजलीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमागे कारण तरी काय आहे...

पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदीचे हे आहे कारण, वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर
पतंजलीवर कारवाई का?
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 2:30 PM

Patanjali Misleading Ads Case, Supreme Court Hearing : रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण जवळपास एक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात खेटा घालत आहेत. पतंजली आयुर्वेदच्या भ्रामक जाहिराती प्रकरणात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी योगगुरु रामदेव बाबा आणि पंतजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण हे सुनावणीवेळी कोर्टात हजर होते. न्यायालयाने दोघांना सुनवाणीला हजर राहण्यास सूट दिली. तर माफीनामा प्रसिद्ध केलेले वृत्तपत्र न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले.

14 उत्पादनांचा परवाना रद्द

यापूर्वी 23 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने पतंजली आयुर्वेदद्वारे वृत्तपत्रात दिलेला माफीनाफा खारीज केला होता. माफीनामा त्याच आकारात छापण्यात यावा, ज्या आकारात जाहिरात छापण्यात आली आहे, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांचा परवाना उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने रद्द केला आहे.

हे सुद्धा वाचा

ही आहेत ती उत्पादनं

उत्तराखंड औषधी विभागाने पतंजलीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द केला आहे. त्यामध्ये स्वासारी गोल्ड, स्वासारी वटी, ब्रोंकोम, स्वासारी प्रवाही, स्वासारी अवलेह, मुक्त वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवमृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड, पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

बाजारात मिळतील ही उत्पादनं

आता ही उत्पादनं बाजारात मिळणार नाही. पतंजली त्यांचे उत्पादन करु शकणार नाही आणि ही उत्पादनं विक्री पण करु शकणार नाही. या उत्पादनावर बंदी आल्याने ही उत्पादनं बाजारातून हटविण्यात आली आहे.

कारण तरी काय?

उत्तराखंड सरकारच्या औषधी विभागाने ही 14 उत्पादनं बंद करण्याचे आदेश दिले होते. अनेक ठिकाणाहून या उत्पादनाविषयी तक्रारी येत होत्या. उत्पादन खपविण्यासाठी भ्रामक, दिशाभूल करणारी जाहिरात करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या तक्रारीनंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने कारवाईचे निर्देश दिले. या उत्पादनाविषयी नोटीस देऊन सुद्धा ती तयार करण्यात येत होती. त्यामुळे औषधे आणि जादूचे उपाय कायदा 1954, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनं कायदा 1945 चे वारंवार उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.