AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, भारताचा शत्रू करणार अमेरिकेचा गेम, खळबळ उडवणारी माहिती समोर

Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गेबार्ड यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

युद्ध सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, भारताचा शत्रू करणार अमेरिकेचा गेम, खळबळ उडवणारी माहिती समोर
Trump Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 18, 2026 | 10:38 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची समर्थक आणि राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गेबार्ड यांनी पाकिस्तानबाबत मोठे विधान केले आहे. बुधवारी त्यांनी सांगितले की, अमेरिकेसाठी पाकिस्तानही एक मोठा अणु धोका आहे. पाकिस्तानसोबतच त्यांनी रशिया, चीन आणि उत्तर कोरियाचाही उल्लेख केला. एका ब्रीफिंगदरम्यान तुलसी गॅबार्ड यांनी हे देश सक्रियपणे नवीन क्षेपणास्त्र वितरण प्रणाली विकसित करत आहेत. या प्रणालींमध्ये अणु आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारचे वॉरहेड्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे अमेरिका त्यांच्या मारक क्षमतेच्या कक्षेत येते असं विधान केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

पाकिस्तानकडून अमेरिकेला धोका

तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, ‘गुप्तचर विभागाच्या आकलनानुसार रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान विविध प्रकारच्या नवीन, प्रगत किंवा पारंपरिक क्षेपणास्त्र वितरण प्रणालींवर संशोधन आणि विकास करत आहेत. यात अणु आणि पारंपरिक दोन्ही प्रकारचे पेलोड समाविष्ट आहेत, आणि ते आमच्या देशाला त्यांच्या मारक श्रेणीत आणतात.’ हा अमेरिकेसाठी मोठा धोका आहे. तुलसी यांनी असेही म्हटले आहे की, उत्तर कोरिया, रशिया आणि चीनसोबत अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

इराणची सत्ता कमकुवत झाली

तुलसी गॅबार्ड यांनी सिनेटसमोर सादर केलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की, ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमरनंतर इराणचा अणु समृद्धीकरण कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला होता आणि त्यानंतर त्याला पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर इराणची सत्ता कमकुवत झाली आहे, मात्र ती अजूनही टिकून आहे. इराण आणि त्याचे सहयोगी मध्य पूर्वेत अमेरिकेवर आणि मित्रदेशांवर हल्ला करण्यास अजूनही सक्षम आहेत.

पुढे बोलताना तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले की, ‘इराणची सत्ता टिकून आहे, पण ऑपरेशन एपिक फ्युरीमुळे ती मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे.’ यानंतर गॅबार्ड यांनी इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या लष्करी कारवाईची माहितीही दिली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं