AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA 3rd T20i : शनिवारी तिसरा सामना, दुसरा विजय कोण मिळवणार?

NZ vs SA 3rd T20i Preview : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

NZ vs SA 3rd T20i : शनिवारी तिसरा सामना, दुसरा विजय कोण मिळवणार?
New Zealand Against South Africa T20i SeriesImage Credit source: @BLACKCAPS X Account
| Updated on: Mar 19, 2026 | 3:28 AM
Share

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे मालिकेत आघाडी घेतली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातून जोरदार कमबॅक केलं. न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता दोन्ही संघांकडे मालिकेत आघाडी घेण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं या दोन्ही संघांपैकी नक्की कोण तिसऱ्या सामन्यात जिंकून मालिकेत आघाडी मिळवतो? याकडे लक्ष असणार आहे.

आतापर्यंत मालिकेत काय झालं?

दोन्ही संघ या मालिकेत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 सेमी फायनलनंतर आामनेसामने आले. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या डोक्यात तो पराभव होताच. दक्षिण आफ्रिकेने टी 20i मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्या पराभवाची परतफेड केली. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला लोळवलं. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत पहिल्या पराभवाची परतफेड करत मालिकेत यशस्वीपणे बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना रंगतदार होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स, न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेपैकी कोण सरस?

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवारी 20 मार्चला होणारा 23 वा टी 20i सामना असणार आहे. त्याआधी उभयसंघात 22 सामने झाले आहेत. या 22 पैकी सर्वाधिक 13 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 9 वेळा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल?

साधारणपणे विजयी संघाची प्लेइंग ईलेव्हन बदलत नाहीत, असा अलिखित नियम आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडून फार काही बदल अपेक्षित नाही. न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याची संभाव्यता आहे. तर दक्षिण आफ्रिका पराभवानंतर काय बदल करते? याकडे लक्ष असणार आहे.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम (विकेटकीपर), टीम रॉबिन्सन, निक केली, मिचेल सँटनर (कर्णधार), जेम्स नीशम, कोल मॅककॉन्ची, जॉश क्लार्कसन, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन आणि बेन सियर्स

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : टोनी डी झोर्झी, कॉनर एस्टरहुझेन (विकेटकीपर), रुबिन हरमन, जेसन स्मिथ, डियान फॉरेस्टर, विआन मुल्डर, जॉर्ज लिंडे, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज (कर्णधार), नकोबानी मोकोएना आणि ओटनील बार्टमन.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?