पीक विम्याचा प्रश्न पेटला, अकोल्यात शेतकरी आक्रमक; विमा कंपनी व कृषी सहायकाविरुद्ध पोलिसात तक्रार

| Updated on: May 30, 2021 | 2:02 PM

पिकांच्या नुकसानीबद्दल चुकीचा अहवाल तयार करुन शेतकऱ्यांचं नुकसान केल्याप्रकरणी विमा कंपनी आणि कृषी सहायकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. crop insurance fake report

पीक विम्याचा प्रश्न पेटला, अकोल्यात शेतकरी आक्रमक; विमा कंपनी व कृषी सहायकाविरुद्ध पोलिसात तक्रार
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

अकोला: जिल्ह्यात सन 2019 – 20 यावर्षीच्या सोयाबीन, उडीद पीक विम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनी व कृषी सहायकाविरुद्ध दहिहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत चोहोट्टा पोलीस चौकीमध्ये शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. मुळात अति पावसामुळे पिकाची पूर्णत: नासाडी झालेली असतानासुद्धा शेतात पीक झाले असे दर्शवण्यात आले. चुकीचा व खोटा अहवाल सादर करुन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनी व कृषी सहायकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Akola Farmers file complaint against insurance company and agriculture assistance regarding crop insurance fake report)

गेल्यावर्षीही चुकीचा अहवाल

मागील वर्षी सोयाबीन पिकाबाबतचा खोटा अहवाल तयार करण्यात आला. मुळात पीक येण्याअगोदरच शेत वखरले गेले होते व पीक उभे नसताना पीक घेतले असा अहवाल पीक विमा कंपनीला देण्यात आला. संपूर्ण जिल्ह्याचीसुध्दा अशीच परिस्थिती असताना सुध्दा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलं आहे.

चौकशीची मागणी

विमा कंपनी आणि कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने कृषी सहायक व एचडीएफसी विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी दहिहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चोहोट्टा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे.

अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मगाणी

पाटसुल येथील शेतकरी मुरलीधर काळे , सतीश डिक्कर ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर , युवा मोर्चा उपाध्यक्ष मंगेश ताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भात केलेल्या तक्रारीवर पोलीस काय कार्यवाही करतात हे पाहावं लागणार आहे.

पीक विमा योजनेचा उद्देश

प्राकृतिक संकट, कीड आणि अन्य रोगांमुळं पिकांचं नुकसान होतं. पीक विमा योजनेत समावेश असलेल्या पिकांना विमा कवच देण, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा योजनेचा उद्देश आहे. शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींच्या वापराला प्रोस्ताहन देणे यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

पीक विमा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येईल. राज्य सरकारकडून खरिप आणि रब्बी हंगामासाठी जाहिरात दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करणं हे ऐच्छिक असून बंधनकार नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज तुम्हाला बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध होईल किंवा विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. pmfby.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येईल.

संबंधित बातम्या:

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो

(Akola Farmers file complaint against insurance company and agriculture assistance regarding crop insurance fake report)