AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : बिगर मोसमात कलिंगड लागवडीचे धाडस केले, व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर आले

उत्पादन वाढीसाठी आता पोषक हंगामाच असावे असे काही नाही. तर पिकासाठी अनुकूल वातावरण तयार करुनही उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या उन्हाळी हंगामात याचा प्रत्यय आला आहे. म्हणूनच उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. पण यापूर्वीच कळंब तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने बाजारपेठेचे गणित ओळखून कडाक्याच्या थंडीमध्ये एका एकरामध्ये कलिंगडाची लागवड केली होती. कलिंगड हे हंगामी पीक असून अडीच महिन्यात पीक पदरात पडते पण या दरम्यान योग्य प्रकारे जोपसणा झाली तरच हे शक्य आहे.

Success Story : बिगर मोसमात कलिंगड लागवडीचे धाडस केले, व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर आले
कळंब तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्याने बिगर मोसमात कलिंगडची लागवड करुन उत्पन्नात भर पाडली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 17, 2022 | 2:33 PM
Share

उस्मानाबाद: उत्पादन वाढीसाठी आता पोषक हंगामाच असावे असे काही नाही. तर पिकासाठी(favorable Environment) अनुकूल वातावरण तयार करुनही उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात याचा प्रत्यय आला आहे. म्हणूनच उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. पण यापूर्वीच कळंब तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने बाजारपेठेचे गणित ओळखून कडाक्याच्या थंडीमध्ये एका एकरामध्ये (Watermelon Cultivation) कलिंगडाची लागवड केली होती. कलिंगड हे हंगामी पीक असून अडीच महिन्यात पीक पदरात पडते पण या दरम्यान योग्य प्रकारे जोपसणा झाली तरच हे शक्य आहे. हाच प्रयोग खडकीचे विजयकुमार राखुंडे यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. डिसेंबरच्या शेवटी त्यांनी एका एकरात लागवड केलेल्या कलिंगडातून केवळ 80 दिवसांमध्ये त्यांना 4 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थिती निर्माण झाली तरी वेगळी वाट निवडल्याने काय होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

कलिंगडची तोडणी अन् व्यापारी बांधावर

उत्पादन वाढवणे आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणे हे जरी शेतकऱ्यांच्या हाती असले तरी बाजारपेठ आणि दर हे शेतकऱ्यांच्या हाती नाही. त्यामुळेच उन्हाळ्याच्या तोंडावर माल विक्रीला यावा या दृष्टीने विजयकुमार आणि त्यांचे बंधु राजकुमार यांनी नियोजन केले होते. सर्वकाही वेळेत होत गेले आणि आता कलिंगडला मागणीही चांगली आहे. त्यामुळे 42 टनापैकी 34 टन कलिंगडाची विक्री ही बांधावर झाली आहे. कलिंगडचा चांगला दर्जा असल्यामुळे व्यापाऱ्यांनी 14 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली आहे. यामधून राखुंडे बंधु यांना 5 लाख 40 हजाराचे उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय 1 लाख खर्च वजा होता 4 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

असे केले कलिंगडाचे व्यवस्थापन

कलिंगड हे हंगामी पीक असले तरी कोणत्या वेळेत दर मिळतील याचे गणित महत्वाचे आहे. काही शेतकरी हे उन्हाळ्याच्या तोंडावर विक्री करता येईल याचा विचार करतात. तर काहीजण हे रमजान महिन्यात अधिकची मागणी असते त्याप्रमाणे लागवड करतात. मात्र, या दोन महिन्याच्या योग्य नियोजनावरच दर आणि सर्वकाही ठरते. राखुंडे यांनी एका एकरात शुगर क्विन वाणाची लागवड केली होती. दोन्ही रोपांमध्ये 6 फुटाचे अंतर सोडून सरी पध्दतीने लागवड केली तर सबंध शेत जमिनीवर मल्चिंगचे अच्छादन होते. यामुळे तणही वाढले नाही पाण्याचे बाष्पीभवनही प्रतिबंधित होते. पाण्याचे बचत आणि त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे म्हणून ठिबकच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्यात आला होता. क्षेत्र कमी असले तरी योग्य नियोजनामुळेच हे शक्य झाले आहे.

कलिंगडाची गोडी अन् राखुंडे बंधुंचे धाडस

चांगल्या दर्जाच्या शेतामालाला किंमत ही मिळतेच. त्याच प्रमाणे राखुंडे यांनी निवडलेल्या शुगर क्विन या वाणाच्या कलिंगडाची चव काही औरच आहे. त्यामुळेच व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. शिवाय तीन महिन्यापूर्वीच उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारपेठेचे चित्र काय राहिल याचा अंदाज घेऊन केलेली लागवड आज फायद्याची ठरलेली आहे. त्यामुळे 2 महिन्यात चार लाखाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop : हमीभावपेक्षा कमी दर तरीही खुल्या बाजारपेठेतच हरभऱ्याची विक्री, शेतकऱ्यांच्या निर्णयामागचे कारण काय?

Crop Insurance : खरिपापूर्वीच पीकविमा योजनेचा निर्णय, केंद्राबरोबर की राज्याची स्वतंत्र यंत्रणा..!

Photo Gallery : अतिरिक्त ऊस कारखान्यावर नव्हे तर फडातच आगीच्या भक्षस्थानी, काय आहेत कारणे?

Follow Us
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत