Smart Farmer : महावितरणच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना ‘ऊर्जा’, नांदेड परिमंडळातील 3 हजार शेतकरी थकबाकीमुक्त

| Updated on: Mar 01, 2022 | 10:08 AM

कृषीपंपाची थकबाकी व त्यावरील व्याज यामध्ये सवलत देत 15 हजार 96 कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. असे असतानाही शेतकरी या योजनेत सहभागी होत नाहीत. पण नांदेड परिमंडळातील शेतकऱ्यांना याचे महत्व कळाले असून तब्बल 3 हजार शेतकरी हे थकबाकीमुक्त झाले आहेत.

Smart Farmer : महावितरणच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना ऊर्जा, नांदेड परिमंडळातील 3 हजार शेतकरी थकबाकीमुक्त
Follow us on

नांदेड : कृषी पंपाकडे वाढत्या थकबाकीमुळे (Power supply interrupted) विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सबंध राज्यात केली जात आहे. असे असले तरी दुसरीकडे या वाढत्या (Arrears) थकबाकीतून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून योजना राबवली जात आहे. (Agricultural Pump) कृषीपंपाची थकबाकी व त्यावरील व्याज यामध्ये सवलत देत 15 हजार 96 कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. असे असतानाही शेतकरी या योजनेत सहभागी होत नाहीत. पण नांदेड परिमंडळातील शेतकऱ्यांना याचे महत्व कळाले असून तब्बल 3 हजार शेतकरी हे थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेत परिमंडळातील 1 लाख 35 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे.चालू वीज बिल आणि मार्च 2022 पर्यंतचे सुधारित थकबाकीपैकी 50 टक्केच रक्कमच अदा करावी लागणार आहे.

परिमंडळात नांदेड आघाडीवर

नांदेड परिमंडळात परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध योजनांमध्ये सर्वाधिक सहभाग राहिलेला आहे. यापूर्वी कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमामध्ये सर्वाधिक शेतकरी याच जिल्ह्यातील होते तर पीकविमा योजनेचा लाभही याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आता महावितरणच्या कृषी ऊर्जा अभियानातही परिमंडळात सर्वाधिक शेतकरी हे नांदेड जिल्ह्यातीलच असून त्यापाठोपाठ परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

वसुल रकमेतूनही पायाभूत सुविधा

महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषी उर्जा अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून जी थकबाकी वसूल होणार आहे त्याचा उपयोग त्या क्षेत्रात पायाभूत सुविधा करण्यासाठीच होणार आहे. नांदेड परिमंडळात एकूण 96 कोटी 64 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केलाय. या वसुलीतुन वीज वितरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी अदा केलेली रक्कम आता त्यांच्याच उपयोगी पडणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत आहे.

थकबाकीदारांसाठी नवसंजीवनी

थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च 2022 पर्यंतच्या थकबाकीचा 50 टक्के भरणा केला तर त्यामध्येही 50 टक्के सवलत ही मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी तर या योजनेचा लाभ घेतला तर 15 हजार 353 कोटी 88 लाख रुपये हे माफ होणार आहेत. त्यामुळे या पन्नास टक्के सवलतीचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना तब्बल 30 हजार 450 कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

अतिरिक्त ऊसावर रामबाण उपाय, ऊसतोड कामगारांचा सत्कार अन् वाजत-गाजत स्वागत, नेमका प्रकार काय?

Red Cabbage: भारतामध्ये लाल कोबीची वाढती मागणी, जाणून घ्या लागवड पध्दती अन् फायदे

Onion : कांदा दराचा लहरीपणा, एका रात्रीतून असे काय दर घसरले की, व्यापारीही चक्रावले