Best Farming : दुष्काळ असला तरी शेतकरी होणार मालामाल, फक्त करा या गोष्टी, भरपूर पैशांची हमखास गॅरंटी!

शेतकरी आपल्या शेतात शेतीपूरक व्यवसाय उभारू शकतात. यासह शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग उभा करण्याचाही पर्याय आहे. या व्यवसायांतून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.

Best Farming : दुष्काळ असला तरी शेतकरी होणार मालामाल, फक्त करा या गोष्टी, भरपूर पैशांची हमखास गॅरंटी!
farming and other business
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 6:08 PM

Farming And Other Business : सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे. राज्य सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केलाय. शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेलाय. आता रबी हंगामात तरी निसर्गाची कृपा बरसावी अशी आशा शेतकरी लावून बसला आहे. दुसरीकडे सरकारतर्फेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. सरकार मदत करत असले तरीही शेतकऱ्यांना या पैशांतून आपली आर्थिक गरज भागवणे कठीण आहे. शेती हाच शेतकऱ्यांच्या अर्थाजनाचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु आता पाऊसच नसल्याने नेमकं काय करावं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वरुणराजा रुसलेला असला तरीही शेतकरी आपल्या शेतात काही पुरक व्यवसाय करू शकतात. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे व्यवसाय केले तर त्यांना त्यातून चांगले पैसे मिळू शकतात. हे व्यवसाय नेमके काय आहेत? ते जाणून घेऊ या…

शेतकरी आपल्या शेतात शेतीपूरक व्यवसाय उभारू शकतात. यासह शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग उभा करण्याचाही पर्याय आहे.

Loading...

चटणी उद्योग- शेतकरी अर्थाजनासाठी स्थानिक बाजारात चांगली मागणी असलेल्या जिंजर-गार्लिक किंवा चटणी निर्मिती उद्योग उभारू शकतात. यातून चांगला नफा मिळू शकतो.

शेवया आणि पापड निर्मिती- शेवया आणि पापड निर्मितीचा उद्योगही शेतकऱ्यांना करता येऊ शकतो. हा उद्योग उभारण्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचीही गरज नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

पिठाची गिरणी- शेतकऱ्यांना आपल्या घरीच हा व्यवसाय करता येऊ शकतो. पिठाची गिरणी खरेदी करताना शासनही महिलांना विशेष आर्थिक मदत करतं. यातून घरखर्चासाठी चांगले पेसे मिळू शकतात.

मधुमक्षिका पालन- शेतकरी आपल्या शेतात मधुमक्षिका पालन करू शकतात. यातून मिळणाऱ्या नैसर्गिक मधाला बाजारात चांगला भाव आहे. या शेतीपूरक व्यवसायात जम बसल्यास शेतकरी आर्थिक पातळीवर मोठी प्रगती करू शकतात.

कुक्कुटपालन- कुक्कुटपालन हा व्यवसायही आजकाल अनेक शेतकरी करत आहेत. सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय. परंतु कोंबड्यांना लागणारे खाद्य तुम्हाला उपलब्ध होण्याची शक्यता असेल तर तुम्ही या व्यवसायात उतरू शकता. यातून तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us