ऐन दुष्काळात आनंदाची बातमी ! सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; थेट कर्जमाफीची…
ऐन दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. तातडीची ₹5000 मदत आणि दुष्काळ निवारण उपाययोजनांसह, कर्जमाफीची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीतील 1.15 लाख पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांची आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळातून सावरण्यासाठी सरकारने तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुष्काळ निवारणासाठी चाऱ्यापासून पाण्यापर्यंतच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीची चौथी यादी आधार प्रमाणिकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या समस्या दूर होणार आहे.
कर्जमाफीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 1 लाख 15 हजार 697 पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती आणि 2 लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
किती रक्कम जमा
आतापर्यंत 15.85 लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर 13 हजार 275 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 16 लाख 96 हजार 201, दुसऱ्या यादीत 4 लाख 19 हजार 737 आणि तिसऱ्या यादीत 3 लाख 51 हजार 192 अशा एकूण 24 लाख 67 हजार 130 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आता एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि 2 लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या 1 लाख 15 हजार 697 पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.
एक दृष्टीक्षेप
– या यादीमध्ये एकापेक्षा अधिक बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
– या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जथकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.
– शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.
– या यादीतील राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्जथकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
– या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी मृत, तसेच वयोवृद्ध आणि बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.
– आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात येणार आहे.
