Video | नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई

| Updated on: Mar 07, 2021 | 2:02 PM

नांदेड जिल्ह्यातील शंकर गवळी आणि माधव गवळी हे युवा शेतकरी जिरेनियम शेतीतून वार्षिक 4 ते 5 लाखांचं उत्पन्न काढत आहेत. Gavali Geranium Farming

Video | नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई
माधव गवळी, शंकर गवळी, युवा शेतकरी
Follow us on

नांदेड: राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारातना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील उमरी इथल्या शेतकरी भावंडांनी जिरेनियमच्या शेतीचा (Geranium Farming) यशस्वी प्रयोग केलाय. शंकर गवळी आणि माधव गवळी या चुलत भावंडांनी एकत्र येत जिरेनियम अर्थात सुगंधी वनस्पतीच्या शेतीतून वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न काढलंय. जिरेनियम या वनस्पतीपासून सुगंधी तेल काढण्याचे युनिट या भावांनी तयार केलय. एका एकर जिरेनियमच्या वनस्पतीपासून दीड लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे या शेतकऱ्यांने सांगितलंय. (Nanded Youth Farmer Madhav Gavali and Shankar Gavali successful in Geranium Farming)

एकरी लागवडीचा खर्च 50 हजार

भारतात औद्योगिक क्षेत्रात जिरेनियमची प्रचंड मागणी आहे. मात्र अगदी सहज पिकणारे हे पीक असूनही भारतात याचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात घेतल्या जाते. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके सोडून जिरेनियमची शेती करावी असे आवाहन या शेतकऱ्यांने केलय. सहा रुपयांना जिरेनियमचं रोप मिळतं. पहिल्या तीन ते चार महिन्यात याची कापणी होते. पहिल्या कापणी थोडं कमी उत्पन्न मिळतं मात्र पुढील तोड्यांमध्ये ते वाढत जातं, असं माधव गवळी सांगतात. एका किलोला साडे बारा हजार रुपये मिळतात. मुंबईच्या कंपन्यांशी करार केल्यालं हमखास उत्पन्न मिळतं, असं गवळी सांगतात. जिरेनियमच्या शेतीला मराठवाड्यातील वातावरण चांगलं आहे. पारंपारिक शेतीमध्ये उत्पन्नाची हमी नसल्यानं या पिकाकडे वळल्याचं माधव गवळी सांगतात.

जिरेनियम शेतीतून कृषी अधिकाऱ्यांना आशा

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर पीक घेतल्यानं उत्पादनात घट होत आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरेनियम पिकाची लागवड सुरु केली आहे. प्रक्रिया केंद्र उभं करुन जिरेनियम या वनस्पतीच्या पानांपासून तेल काढलं जाते. जिरेनियमच्या तेलाला 12 ते 14 हजारांपर्यंत भाव मिळतो. एकरी 10 ते 15 किलो तेलाचं उत्पादन करता येते. साधारणता शेतकऱ्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं, असं कृषी अधिकारी रमेश चलवदे यांनी सांगितले.

तेलाचं काय होत?

जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटानं एकत्रित येऊन उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यांना फायदा होतो. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर राबवता येईल. सुगंधी वस्तूंची मागणी पाहता जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो, असंही रमेश चलवदे म्हणाले.


संबंधित बातम्या:

जिरेनियम: सुगंधी वनस्पती शेतीतून फुलवला संसार, नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

चंदनाची शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा; विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान? वाचा स्पेशल रिपोर्ट

(Nanded Youth Farmer Madhav Gavali and Shankar Gavali successful in Geranium Farming)