टोमॅटो उत्पादकांच्या अडचणी वाढल्या, दर पडले, खर्चही निघेना, नाशिक ते औरंगाबाद शेतकऱ्यांचा संताप

| Updated on: Aug 26, 2021 | 12:02 PM

महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. टोमॅटोला कमी भाव मिळाल्यामुळं शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

टोमॅटो उत्पादकांच्या अडचणी वाढल्या, दर पडले, खर्चही निघेना, नाशिक ते औरंगाबाद शेतकऱ्यांचा संताप
औरंगाबाद टोमॅटो आंदोलन
Follow us on

नाशिक: महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. टोमॅटोला कमी भाव मिळाल्यामुळं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी योग्य दर न मिळाल्यामुळं टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत. येवल्यातील एका तरुण शेतकऱ्यानं देखील काल रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले होते.

नाशिकमध्ये बाजार समितीत टोमॅटो फेकले

नाशिक मध्ये टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे.भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो नाशिक बाजार समिती आवारातच फेकून देत संताप व्यक्त केला.शेतकऱ्यांनी आणलेला आपला माल फेकून दिल्याने बाजार समिती आवारात रस्त्यावर टोमॅटोचा खच बघायला मिळाला. दरम्यान,भाजीपाला नंतर आता टोमॅटोचे देखील दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे, असं तरुण शेतकरी संदीप जगताप म्हणाले आहेत.

औरंगाबादमध्येही शेतकरी आक्रमक

औरंगाबादमधील पैठणमध्ये काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यानं ट्रॉलीभर टोमॅटो रस्त्याकडेला फेकून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मुंबई हायवेवर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं. अनेक ट्रॅक्टर टोमॅटो रस्त्यावर ओतून शेतकरी आंदोलन करण्यात आलं.औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन इथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मुंबई हायवे जॅम करून शेतकऱ्यांनी आंदोलन केलंआहे.

देशांतर्गत मागणी घटली

नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. या कारणामुळे टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होताना दिसते आहे. लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 60 ते 100 रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. कमी दरामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला वाहतूक, मार्केटमधील चढ-उतर, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती आहे.

येवल्यातही शेतकऱ्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकले

येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील तरुण शेतकरी आदित्य जाधव याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याने 80 हजारहून अधिक खर्च करून एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली, सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. आदित्य जाधव यांना त्यातून 15 हजार रुपयांच्या जवळपास रक्कम हातात आली.

इतर बातम्या:

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

Nashik and Aurangabad Tomato Farmers angry over low rates to Tomato