लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

कांद्याची नगरी असलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली आहे. बाजारसमितीत 30 हजार 500 क्रेट्स आवक झाली होती 3 ते 5 रुपये इतका किलोला दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु
लासलगांव बाजार समिती

नाशिक: कांद्याची नगरी असलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली आहे. बाजारसमितीत 30 हजार 500 क्रेट्स आवक झाली होती 3 ते 5 रुपये इतका किलोला दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदेशात टोमॅटोची जास्त निर्यात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्र सरकारकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

देशांतर्गत मागणी घटली

नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. या कारणामुळे टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होताना दिसते आहे. लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 60 ते 100 रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. कमी दरामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला वाहतूक, मार्केटमधील चढ-उतर, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती आहे.

केंद्राकडं पाठपुरावा सुरु

जास्तीत जास्त टोमॅटोची निर्यात इतर राज्यांसह विदेशात कशी वाढवता येईल यासाठी टोमॅटो निर्यातदार व्यापाऱ्यांनी लासलगांव बाजार समितीकडे मागणी केलीय. लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार नव्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेल्या डॉक्टर भारती पवार यांच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश यासह आखाती देशात टोमॅटो कसा जास्त निर्यात करता येईल यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

पाऊस कमी असल्याने टोमॅटोच्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. लासलगाव जवळील मरळगोई येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी योगेश फापाळे यांनी अर्धा एकर टोमॅटो पिकाची लागवड शेतात केली होती. त्यांना 60 ते 70 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला आहे. टोमॅटोचे उत्पादन सुरू झाले लासलगाव बाजार समितीत सव्वाशे क्रेट्स मधून टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. एका क्रेटला शंभर रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. हा बाजार भाव न परवडणारा असल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी सांगत आहेत. शेतातून टोमॅटो तोडणी आणि वाहतूक खर्च याचा जर विचार केला तर 40 ते 50 रुपये इतका एक क्रेट्सला खर्च येत असल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी सांगतात.

इतर बातम्या:

लाल चिखल, दर पडल्यानं रस्त्याकडेला टोमॅटोचा सडा, शेतकऱ्यांना हमीभाव कधी मिळणार?

ढबू घ्या ढबू…. फुकट घ्या ढबू, ट्रॉलीभर ढबू 17 मिनिटात फस्त; सांगलीत नेमंक काय घडलं?

Tomato price down in Lasalgaon APMC traders demanded

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI