जे नको व्हायला हवं होतं तेच झालं, अवकाळीने शेतकऱ्याला केले उद्ध्वस्त; शेतकऱ्याला आता कोण वाचणार?

| Updated on: Mar 16, 2023 | 7:49 AM

बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस पुन्हा कोसळू लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. दुसऱ्यांदा आलेल्या या संकटात शेतकरी कसा उद्ध्वस्त झालाय हे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

जे नको व्हायला हवं होतं तेच झालं, अवकाळीने शेतकऱ्याला केले उद्ध्वस्त; शेतकऱ्याला आता कोण वाचणार?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : हवामान विभागाने जसा अंदाज सांगितला तसा राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाच्या दरम्यान काही ठिकाणी गारपीठ झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळेला हा अवकाळी पाऊस येऊन कोसळल्याने शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्रीच्या वेळेला शेतातील चित्र वेगळे होते. मात्र, सकाळी उठून बघताच शेतमालाचा अक्षरशः चिखल झाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या नुकसानीची मदत सोडाच पंचनामेही झालेले नसतांना आता दुसऱ्यांदा अवकाळी पाऊसाचे संकट कोसळल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस झाल्यावर शेतमाल अक्षरशः भुईसपाट झाला आहे. यामध्ये कांदा, द्राक्ष आणि केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय भाजीपाल्याला देखील मोठा फटका बसणार आहे.

द्राक्ष हे पीक काढणीला आले होते, त्यातच मागील आठवड्यात अवकाळी पाऊस पडला याशिवाय गारपीठही काही ठिकाणी झाली. त्यामुळे जो द्राक्ष चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकला जात होता, तो द्राक्ष आता 15 ते 20 रुपये किलोने विकला जात होता. अशातच पुन्हा अवकाळी पाऊस कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे ज्या शेतकाऱ्यांच्या द्राक्षाचा भाव ठरला गेला आहे. त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याचा फोन येतो का ? याची भीती आहे. अचानक फोन येऊन द्राक्ष खरेदीचा निर्णय रद्द होईल, भाव कमी केले जाईल अशी स्थिती होती. त्यात आहे तो मालही मातीमोल झाल्याने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे.

कांद्याला आधीच भाव नव्हता, त्यामुळे साठवून ठेवण्यासाठी चांगला असलेला उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागला होता. त्यामुळे कुठेतरी उन्हाळ कांद्याचा काढणीला सुरुवात झाली होती. त्यातच पाऊस आल्याने कांदा खराब होणार आहे. तो सडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामध्ये काढणीला आलेले गहू देखील भुईसपाट झाले आहे. हाती आलेले जवळपास सर्वच पिके दुसऱ्यांदा आलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. काही अंशी मागील अवकाळीतून पीक वाचले होते. दिलासा मिळेल अशीही स्थिती नव्हती मात्र काही शेतकऱ्यांना दिलासा होता.

शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असतांना अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. शासकीय अधिकारी अद्यापही शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत राम भरोसेच आहे. त्यात आता पुन्हा आलेले संकट शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटात टाकले आहे.

सलग आणखी दोन दिवस ही स्थिती राहणार असल्याने शेतकऱ्याच्या शेतात जितकं पाणी आहे तितकेच पाणी शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यातून वाहत आहे. शेतातील ही परिस्थिती पाहून शेतकरी सुन्न झाला आहे.