AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं

कांदा दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात कांद्याचे दर वाढतात पण यंदा परस्थिती बदलले आहे. खरिपातील लाल कांद्याची आवक संपल्यानंतर सुरु झालेली घसरण अद्यापही कायम आहे. खरीप हंगामात कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा आणि पोषक वातावरणाचा फायदा घेण्याचा निर्धार केला. सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाले असताना दरातील लहरीपणामुळे पुन्हा वांदा झाला आहे.

Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 14, 2022 | 9:26 AM
Share

पुणे :  (Onion Rate) कांदा दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. दरवर्षी (Summer Crop) उन्हाळ्यात कांद्याचे दर वाढतात पण यंदा परस्थिती बदलले आहे. खरिपातील लाल कांद्याची आवक संपल्यानंतर सुरु झालेली घसरण अद्यापही कायम आहे. खरीप हंगामात कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा आणि (Nurturing environment) पोषक वातावरणाचा फायदा घेण्याचा निर्धार केला. सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाले असताना दरातील लहरीपणामुळे पुन्हा वांदा झाला आहे. खेड तालुक्यातील चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढत आहे पण दिवसाकाठी दरात घसरण ही सुरुच आहे. दोन दिवसांमध्येच कांद्याचे दर हे 100 रुपयांनी घसरले आहेत.

निर्यातीचीही संधी हुकली, नगदी पिकातून शेतकऱ्यांची निराशा

उत्पादनात वाढ झाल्याने यंदा कांदा निर्यातीमधूनही उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शिवाय कांद्याचे दर वाढताच मध्यंतरी केंद्र सरकराने साठवणूकीतला कांदा राज्यातील मुख्य मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दर नियंत्रणात ठेवले होते. त्याचाही परिणाम थेट वाढत्या दरावर झाला होता. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी नाही आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्च काढणेही मुश्किल झाले आहे.

उन्हाळी कांद्याची आवक वाढली दर घटले

सध्या बाजारपेठेत उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु आहे. पोषक वातावरणामुळे कांदा चांगला पोसलेला आहे. शिवाय चमकही आहे असे असतानाही मागणीच नसल्याने कांदा दरात दिवसेंदिवस घट होत आहे. खेड तालुक्यातील चाकण मार्केटमध्ये दिवसाकाठी 10 हजार गोण्यातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याला प्रति क्विंटल 700 ते 1 हजार दरम्यानचे दर मिळत आहेत. शिवाय कांदा दराची आवक वाढली तर दरात आणखीन घसरण होईल असा अंदाज आहे. खरीप हंगामात उत्पादन घटले तर विक्रमी दर मिळाला होता. तर आता उन्हाळी हंगामात यापेक्षा उलटी परस्थिती निर्माण झाली आहे.

दीड महिन्यामध्ये बदलले कांदा दराचे चित्र

फेब्रुवारी महिन्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असताना 3 हजार 500 रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता. यामुळे सोलापूर, लासलगाव या मुख्य बाजारपेठांचे व्यवहार हे अधिकच्या आवकमुळे बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली होती. लाल कांद्याला अधिकची मागणी होती. पण अवघ्या दीड महिन्यात परस्थिती बदलली आहे. चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये 800 रुपये क्विंटल असा सरासरी दर मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका

Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!

Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा