AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?

एकीकडे नवनवीन प्रयोग राबवून शेती उत्पादनात वाढ केली जात आहे. एवढेच नाही तर उत्पादनवाढीसाठी आंतरपिक, बेगर हंगामी पिकांचेही प्रयोग केले जात आहेत. असे असताना गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध गावातील तब्बल 500 हेक्टर शेतजमिन पडिक ठेवण्यातच शेतकऱ्यांनी धन्यता मानली आहे. याला कारणही तसेच आहे. गावा शिवाराला लागूनच अभयारण्य उभारण्यात आले आहे. त्यामुळे या आरण्यातील शेत काय आणि आरण्य काय? अशी परस्थिती झाली आहे.

Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?
वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे गोदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध गावच्या शिवारातील 500 हेक्टर जमिन ही पडिक आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 3:57 PM
Share

गोंदिया : एकीकडे नवनवीन प्रयोग राबवून शेती उत्पादनात वाढ केली जात आहे. एवढेच नाही तर (Production) उत्पादनवाढीसाठी आंतरपिक, बेगर हंगामी पिकांचेही प्रयोग केले जात आहेत. असे असताना (Gondia District) गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध गावातील तब्बल 500 हेक्टर शेतजमिन पडिक ठेवण्यातच शेतकऱ्यांनी धन्यता मानली आहे. याला कारणही तसेच आहे. गावा शिवाराला लागूनच (Sanctuary) अभयारण्य उभारण्यात आले आहे. त्यामुळे या आरण्यातील शेत काय आणि आरण्य काय? अशी परस्थिती झाली आहे. वन्यप्राण्यांचा शेतशिवारामध्ये वावर वाढला असून शेती व्यवसाय करणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीने तब्बल 500 हेक्टर शेतजमिन ही पडिक आहे. त्यामुळे बारामाही पीक तर दूरच हंगामी पिकेही घेणे मुश्किल झाले आहे.

खरिपात केवळ धान लागवड

विदर्भात धान शेतीचे क्षेत्र अधिक आहे. खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यात ही वन्यप्राणी हे अभयराण्याच्या बाहेर सहसा येत नाहीत. शिवाय या काळात अभयराण्यातच खाण्यासाठी भरपूर काही असते. त्यामुळे वन्यप्राण्यांचा या चार महिन्यात त्रास कमी असतो. म्हणून तर या गावचे शेतकरी केवळ धान पिकाचे उत्पादन घेतात व उर्वरीत काळात शेत पडिक ठेवणेच पसंत करीत आहेत. गेल्या 6 वर्षापासून ही परस्थिती ओढावली आहे. अभयारण्य तर उभारले आहे पण वन्यप्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

300 शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम

नवेगावबांध गावच्या शिवाराला लागूनच हे अभयारण्य उभारण्यात आले आहे. याला लागूनच प्रगतशील शेतकरी रामदास बोरकर त्यांची दोन हेक्टर शेती आहे. 2016 नंतर त्यांनी खरीपातील धान पिकाशिवाय इतर उत्पन्नच घेतलेले नाही. यांच्यासारखेच गावात 300 शेतकरी आहेत ज्यांनी खरीप व्यतिरिक्त इतर पिकांचे उत्पादनच घेतलेले नाही. आरण्य उभारताना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तताच करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता ही वेळ आली आहे.

असा हा वन्यप्राण्यांचा उपद्रव

2016 पूर्वी रब्बी हंगामातील उडीद,चना, तूर यासारखी अनेक पिके घेतली जात होती. मात्र अभयारण्य झाल्यापासून वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस होऊ लागली शिवाय रानडुकरे रात्रीतूनच पिके फस्त करु लागली. त्यामुळे वाढीव उत्पादन तर नाहीच पण जे पेरले तेवढे सुध्दा शेतकऱ्यांच्या पदरी नाही. उभे कड़धान्य पिक हरिन फस्त तर रान डुक्कर उध्वस्त करू लागले. सतत होत असलेले नुकसान लक्षात येथील 300 शेतकऱ्यांनी त्यांच्या जमीनी पडिक ठेवल्या आहे. यामुळे तब्बल 500 हेक्टर जमीन पडिक आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : आंबेगावच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीमध्ये विसावा घेत आहे बैलजोडी

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?

Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.