AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चा संघटनेचे धोरण काय ?

शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देशच साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढायचे कसे असा सवाल आता संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे. शिवाय हमीभावाच्या जनजागृतीसाठी देशभर आंदोलने, निदर्शने आणि वाख्यानांद्वारे किमान आधारभूत दराबाबत जनजागृती केली जाणार आहे.

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चा संघटनेचे धोरण काय ?
शेतीमालाच्या हमीभावासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून देशभर जनजागृती केली जात आहे.
| Updated on: Apr 13, 2022 | 5:28 PM
Share

मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देशच साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढायचे कसे असा सवाल आता संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे. शिवाय हमीभावाच्या जनजागृतीसाठी देशभर आंदोलने, निदर्शने आणि वाख्यानांद्वारे किमान आधारभूत दराबाबत जनजागृती केली जाणार आहे. 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभर कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

एका जिल्ह्यात एक कार्यक्रम

हमीभावाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी हाच उद्देश ठेऊन ही जनजागृतीची मोहीम किसान मोर्चाने हाती घेतली आहे. हमीभाव दिला जात नसला तरी तो कायद्याने कसा मिळवायचा यासाठी ही मोहीम असणार आहे. 11 एप्रिलपासून सात दिवस विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती केली जात आहे. एका जिल्ह्यामध्ये किमान एक कार्यक्रम घेऊन नेमक्या मागण्या काय आणि शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावयाची हे सांगितले जाणार आहे. केंद्र सरकारला दीड पट भाव देण्याच्या आश्वासनाची या दरम्यान आठवूण करुन दिली जाणार आहे.

चर्चेच्या 11 फेऱ्या निष्फळ आता निकालच

हमीभावाच्या अनुशंगाने केंद्र सरकार आणि संयुक्त किसान मोर्चामध्ये एक-दोन नाही तर 11 वेळेस या विषयावर चर्चा झाली आहे. मात्र, कोणताच निर्णय पदरी पडलेला नाही. यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान सुरुच आहे. हमीभावाचा कायदा करण्याच्या अनुशंगाने समिती नेमण्याच्या अनुशंगाने नावेही मागितली होती. मात्र, त्यावरही कोणता निर्णय झालेला नाही.

शेतकऱ्यांचा नेमक्या मागण्या काय?

आता केवळ 23 पिकांनाच हमीभावाचा आधार मिळत आहे. मात्र, फळे, भाजीपाला, दूध, अंडे यांच्यासह सर्वच पिकांना हमीभाव मिळावा, हमीभाव देताना उत्पादनावरील एकूण खर्चाच्या दीडपट दर द्यावा, आधारभूत किंमतीची केवळ घोषणा न होता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, शिवाय हमीभावावरच सर्वकाही आहे असे नाही तर मनरेगा आणि किमान वेतनासारख्या कायदेशीर हमीचे स्वरुप देण्यात यावे अशा मागण्या घेऊन या जनजागृतीला प्रारंभ करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?

Summer Crop: उन्हाळी सोयाबीन बहरात असतानाच कृषी विभागाचा अंदाज काय? शेतकऱ्यांचा उद्देश होणार का साध्य?

Turmeric Crop: अवकाळीच्या धास्तीने रखरखत्या उन्हात जगाचा पोशिंदा राबतोय, हळदीच्या विक्रमी दरासाठी धडपडतोय

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.