PM Kisan Yojana: 23 वा हप्ता कधी जमा होणार? विसरू नका 30 जून ही डेडलाइन, आजच करा हे काम

PM Kisan Yojana Update: पीएम किसान योजनेचा 23 व्या हप्त्यासाठी शेतकर्‍यांना 30 जूनपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे गरजेचे आहे. पण त्यापूर्वी शेतकर्‍यांनी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

PM Kisan Yojana: 23 वा हप्ता कधी जमा होणार? विसरू नका 30 जून ही डेडलाइन, आजच करा हे काम
23 वा हप्ता कधी जमा होणार? विसरू नका 30 जून ही डेडलाइन
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 03, 2026 | 3:34 PM

PM Kisan Yojana Update: कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. राज्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारने कर्जमाफी मंजूर केली आहे. राज्यातील लाखो शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवते. त्यात पीएम किसान ही एक योजना आहे. या योजनेतंर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक लाभ पोहचवल्या जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 22 हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी वेळोवेळी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नाहीतर मग योजनेचा हप्ता जमा होत नाही.

30 जूनपूर्वी पूर्ण करा महत्त्वाची कामे

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी हप्ता येण्यापूर्वी ई-केवायसीचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुम्ही पुढील हप्त्याची प्रतिक्षा करत असाल तर सरकारच्या नियमानुसार, तुम्हाला 30 जूनपर्यंत ई-पडताळणी म्हणजे e-KYC ची प्रक्रिया प्रत्येक वर्षी पूर्ण करणे गरजेचे आहे. जे शेतकरी निश्चित मुदतीत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही असे धोरण आहे.

या धोरणानुसार, सरकार या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा आणि गरजू शेतकऱ्यांनाच फायदा व्हावा हे ठरलेले आहे. बोगस लाभार्थ्यांना चपराक बसावी यासाठी सरकार वेळोवेळी ई-केवायसी प्रक्रिया राबवत असते. यामध्ये जर लाभार्थ्यांनी उशीर केला. अथवा नावात, खाते क्रमांक चुकला तर पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार नाही.

पडताळणी प्रक्रिया कशी कराल पूर्ण?

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. अथवा लांबच लांब रांगेत उभे ठाकण्याची गरज नाही. तुम्ही घरीबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरुन अवघ्या काही मिनिटात हे काम पूर्ण करू शकतात.

त्यासाठी अगोदर पीएम किसानच्या अधिकृत साईटवर जाऊन ‘e-KYC’ पर्यायावर क्लिक करावे.

त्यानंतर नमूद प्रक्रिया पूर्ण करावी. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल, तो सबमिट करावा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची डिजिटल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

जर तुम्हाला ऑनलाईन ही प्रक्रिया पूर्ण करता येत नसेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊन बायोमॅट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी. त्यामुळे पुढील हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

Follow Us