AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: केवळ 50 हजारांची कर्जमाफी? कोण पात्र ठरणार? सरकारने तोंडाला पाने पुसली? शेतकरी नेत्याने केला कर्जमाफीचा पर्दाफाश

Farmer Loan Waiver Maharashtra: राज्य सरकारने कर्जमाफीची गेल्या वर्षी घोषणा केली होती. काल मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार, शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. पण अटी आणि शर्ती पाहता त्याचा लाभ कुणाला मिळणार यावरून वाद पेटला आहे.

Farmer Loan Waiver: केवळ 50 हजारांची कर्जमाफी? कोण पात्र ठरणार? सरकारने तोंडाला पाने पुसली? शेतकरी नेत्याने केला कर्जमाफीचा पर्दाफाश
शेतकरी कर्जमाफी योजना फसवी? शेतकरी नेते का नाराज?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 03, 2026 | 10:21 AM
Share

Ajit Navale big Allegation on Government: राज्यातील शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने काल मंजूरी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. पण या योजनेत पात्र होण्यासाठी ज्या अटी आणि शर्ती समोर आल्या आहेत. त्यावरून राज्यात वादंग पेटले आहे. राज्य सरकारच्या हेतूवरच शेतकरी नेते शंका उपस्थित करत आहेत. या योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यच शेतकर्‍यांसमोर असल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे. त्यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

कर्जमाफी योजनेचा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना फायदा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर लागू होईल. या योजनेत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचे 36 हजार 585 कोटींचे कर्ज माफ होईल. तर 16 लाख 74 हजार शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा उतरेल. सातबारा कोरा होईल. तर सरकारच्या तिजोरीवर या योजनेमुळे 14 हजार 754 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. लाडक्या बहिणीनंतर आता या योजनेवर सरकारकडून निधी खर्च करण्यात येईल. या योजनेनुसार, दोन लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 16 लाख 48 हजार शेतकऱ्यांचे 17.75 लाख कर्ज माफ होईल.

कर्जमाफीत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, ज्यांची संख्या तब्बल 32 लाख 29 हजार इतकी आहे, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे, अशा शब्दात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

या व्यक्तींना निकषानुसार नाही लाभ

मंत्री, खासदार, आमदारांना योजनेचा फायदा नाही

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीचे सदस्य

बाजार समिती, साखर कारखाने, सुतगिरणी, जिल्हा सहकारी बँक, दूध संघातील पदाधिकारी संचालक

सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी-कर्मचारी

अनुदानित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही

आयकर भरणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही

25 हजारांपेक्षा अधिक वेतन असणारे अधिकारी-कर्मचारी पात्र नसतील

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप