AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप

दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं, दरम्यान या आंदोलनावर आता अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप
abhijit deepkeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 9:36 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅडिकेड लावले, मात्र आंदोलकांनी हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून आश्रुधुराचा वापर करण्यात आला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान त्यानंतर दिल्लीत काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणं लागलं. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली, या घटनेत पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या.दरम्यान या आंदोलनावर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी पोलिसांवर गभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हटलं अभिजित दिपके यांनी?

पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून सीजेपी नेता अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली पोलीस पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला आंदोकांवर देखील लाठीचार्ज केला असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी गुडंगिरी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सरकारने नीट परीक्षा देणाऱ्या 20 विद्यार्थ्यांचा जीव घेतला आहे, तरी देखील त्यांचं अजून समाधान झालेलं नाहीये, आता त्यांनी महिला आंदोलकांवर देखील लाठीचार्ज केला आहे, असा आरोप दिपके यांनी केला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना अभिजीत दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. तसेच सीजेपीच्या वतीने ट्विटरवर एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की आंदोलन सुरूच असून, अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका आणि सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांचं जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरूच आहे.

काय आहेत सीजेपीच्या मागण्या?

दरम्यान आज सीजेपीकडून सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि ज्या विद्यार्थ्यांनी नीट प्रकरणात आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी