CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच…
कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचे काही फुटेज समोर आले आहेत
कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचे काही फुटेज समोर आले आहेत. हे फुटेज हादरवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. या कारवाईनंतर अनेक आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मोबाईलमध्ये संपूर्ण घटना चित्रित केली. आंदोलनादरम्यान काही तरुण “और मारो… मार डालो… म्हणत संताप व्यक्त करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेची दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या आंदोलनामुळे जंतर मंतर आणि संसद भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या या घटनेची देशभर चर्चा सुरू असून आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि त्यानंतर समोर आलेल्या व्हिडीओंमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
Published on: Jul 20, 2026 06:11 PM
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...

