उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंब बागांवर कपड्यांचे अच्छादान

| Updated on: Sep 01, 2023 | 3:06 PM

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दडी मारली आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

1 / 4
मागील तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेपासून डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.

2 / 4
सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकून डाळिंब बागांचे संरक्षण केले आहे. तिथले काही फोटो सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. शेतकरी पावसाची वाट पाहत असून समाधानकारक पाऊस न झाल्यास त्याचा फळबागांवर चांगलाचं परिणाम दिसणार आहे.

3 / 4
पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई अनेक भागात निर्माण झाली आहे. त्यातचं उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे डाळिंब फळांवर काळे डाग येण्याचा धोका वाढला आहे. पुढच्या काळात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

4 / 4
शिवाय झाडांवर मर रोग येण्याची शक्यता ही बळावली  आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून डाळिंब बागांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही शक्कल लढवली आहे.