AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवाद, व्यापार आणि स्टार्टअप… इस्रायली संसदेतून PM मोदींचे जगाला 10 मोठे संदेश

PM Modi in Israel : पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी इस्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

दहशतवाद, व्यापार आणि स्टार्टअप... इस्रायली संसदेतून PM मोदींचे जगाला 10 मोठे संदेश
PM Modi Israel visitImage Credit source: Google
| Updated on: Feb 25, 2026 | 11:01 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेला संबोधित केले. आपल्या भाषणात मोदींना दहशतवाद, व्यापार, तंत्रज्ञान यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे जाणून घेऊयात.

  1. दहशतवादी हल्ल्यावर शोक : इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भारतीय जनतेच्या वतीने, मी 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या त्या भयानक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो. आम्ही तुमचे दुःख समजतो. भारत आता आणि भविष्यात पूर्ण विश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे.’
  2. निरपराध लोकांच्या हत्येचे कोणीही समर्थन नाही : पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “निरपराध लोकांच्या हत्येचे कोणीही समर्थन करू शकत नाही. कोणीही दहशतवादाचे समर्थन करू शकत नाही. भारतानेही बऱ्याच काळापासून दहशतवादाचे दुःख सहन केले आहे. तुमच्याप्रमाणेच, आमचेही दहशतवादाबद्दल तडजोड न करणारे धोरण आहे. ‘
  3. दहशतवादाचा उद्देश समाजाला अस्थिर करणे : पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘दहशतवादाचा उद्देश समाजाना अस्थिर करणे, विकासात अडथळा आणणे आणि विश्वास नष्ट करणे आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी सतत आणि समन्वित जागतिक कृती आवश्यक आहे. दहशतवाद हा सर्वत्र शांततेसाठी धोका आहे.’
  4. होलोकॉस्ट : पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या महिन्यात जगाने आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन साजरा केला. होलोकॉस्ट हा मानवतेच्या सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक आहे.
  5. व्यापार : व्यापारावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आम्ही व्यापार वाढवण्यासाठी, गुंतवणूक मजबूत करण्यासाठी आणि संयुक्त पायाभूत सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत. गेल्या वर्षी झालेल्या द्विपक्षीय गुंतवणूक करारामुळे आमच्या व्यवसायांना चालना मिळेल.’
  6. स्टार्टअप नेशन :पंतप्रधान म्हणाले, इस्रायलला अनेकदा स्टार्टअप नेशन म्हटले जाते. 2018 मध्ये पंतप्रधान नेतन्याहू आणि मी भारतात आय-क्रिएट टेक बिझनेस इनक्यूबेटरचे उद्घाटन केले होते. तेव्हापासून, आम्ही अशा 900 स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे.”
  7. प्राचीन संस्कृती : पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारत आणि इस्रायल दोन प्राचीन संस्कृती आहेत. आमच्या संस्कृती परंपरा देखील तात्विक समानता प्रतिबिंबित करतात यात आश्चर्य नाही. इस्रायलमध्ये टिक्कुन ओलमचे तत्व जगाला सुधारण्यावर भाष्य करते. भारतात वसुधैव कुटुंबकम जग एक कुटुंब आहे यावर भर देते.
  8. गाझा शांतता उपक्रमाला पाठिंबा : पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारत गाझा शांतता उपक्रमाला पाठिंबा देत आहे. हा उपक्रम पॅलेस्टिनी समस्येचे निराकरण करण्यासह या प्रदेशातील सर्व लोकांसाठी न्याय्य आणि चिरस्थायी शांततेचे आश्वासन देते.’
  9. वाळवंटात चमत्कार : पंतप्रधान मोदी म्हणाले की, “इस्रायलने वाळवंटात एक चमत्कार केला आहे. मी इस्रायलच्या तरुण प्रतिभेचे भारतात स्वागत करतो. इस्रायलमध्ये योगाचा प्रभाव वाढत आहे. इस्रायलमधील प्रत्येक घरात योगाचा अभ्यास केला जात आहे.’
  10. अर्थव्यवस्था : पंतप्रधान म्हणाले, ‘गेल्या काही काळापासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. भारताने इतर देशांसोबत अनेक महत्त्वाचे व्यापार करार केले आहेत. आता आम्ही लवकरच जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये सामील होऊ.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...