कर्नाटक आंबा ‘देवगड हापूस’ नावानं विकणं महागात पडलं, पुण्यात तिघांवर कारवाई

| Updated on: Apr 26, 2021 | 1:15 PM

पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये कर्नाटक आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करणाऱ्या तिघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Karnataka Mango sale as Kokan Devgad Alphonso

कर्नाटक आंबा ‘देवगड हापूस’ नावानं विकणं महागात पडलं, पुण्यात तिघांवर कारवाई
कर्नाटक आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री
Follow us on

पुणे : पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटक येथून येणारा आंबा’ कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये एच.बी बागवान शेड नं.2, नॅशनल फ्रूट शेड नं.3, लोकमल नारायणदास पंजाबी शेड नं.4 या तीन आडत्यांकडून 17700 रुपये दंड वसूल केला आहे. (Pune APMC Administration action on traders for sale of Karnataka Mango as Kokan Devgad Alphonso)

दुसऱ्या राज्यातील आंब्यांची कोकण हापूस म्हणून विक्री

बाजारात आंब्याचा हंगाम बहरला आहे. परंतु अनेक विक्रेत्यांकडून परराज्यातील विविध जातीचे आंबे ‘कोकण हापूस’ या नावाने विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक काढले आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला आहे.

कर्नाटकच्या आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री

या पार्श्वभूमीवर गरड यांनी बाजारात आंब्याचा व्यापार करणाऱ्या सर्व अडत्यांना सूचना केल्या होत्या. सोमवारी गेट नं. ७ येथील आंबा बाजाराला गरड यांनी भेट दिली. यावेळी काही अडते कर्नाटक येथून येणार आंबा कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेटीत कर्नाटक येथील आंबा भरून त्यामध्ये तो विकला जात होता. यामुळे गरड यांनी तीन आडत्यांवर कारवाई केली आहे.

दंडाची रक्कम वाढणार

कर्नाटक येथील आंबा ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेट्यामध्ये तो विकला जात होता. त्यामुळे पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. त्यानंतर तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

संबंधित बातम्या

ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा, प्रत्येक आंब्यावर क्युआर कोड

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती लाभ झाला?

(Pune APMC Administration action on traders for sale of Karnataka Mango as Kokan Devgad Alphonso)