AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : दोषमुक्तीसाठी रोहित पवार यांनी केला अर्ज, काय आहे प्रकरण ?

कथित शिखर बँक घोटाळाप्रकरणी रोहित पवारांनी मनी लाँडरिंगमधून दोषमुक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टनंतर हा नवा टप्पा आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला १७ मार्चपर्यंत त्यांची भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. कन्नड साखर कारखान्याच्या लिलावावरून आरोप झाले होते. आता रोहित पवारांना दिलासा मिळतो की ईडी आव्हान देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Rohit Pawar : दोषमुक्तीसाठी रोहित पवार यांनी केला अर्ज, काय आहे प्रकरण ?
रोहित पवार
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 8:12 AM
Share

कथित शिखर बँक घोटाळाप्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना दिलासा मिळाला होता. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबई सत्र न्यायालयाने स्वीकारला. त्यानंतर आता रोहित पवार यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिखर बँक घोटाळय़ाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात रोहित पवार यांनी हा अर्ज केला आहे. या अर्जाची न्यायालयाने दखल घेतली असून 17 मार्चपर्यंतल आपलं म्हणणं मांडा असे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. त्यामुळे आता ईडी यावर काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण ?

2019 सालच्या ऑगस्ट महिन्यात याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री केली, नियमांचे उल्लंघन केलं असा आरोप यामध्ये लावण्यात आला होता. याच केसमध्ये जुलै 2024 मध्ये ईडीने तिसरं आरोपपत्र दाखल केलं होते. आणि त्यामध्ये रोहित पवार यांचा आरोपी म्हणून नामनिर्देश होता. 80.56 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने 2009 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेतला व 2012 मध्ये अत्यंत कमी किमतीत त्याचा लिलाव केला, असा आरोप ईडीकडून करण्यात आा होता.

या लिलावाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये रोहित पवार यांच्या बारामती अग्रो लिमिटेडव्यतिरिक्त इतर दोन पक्ष सहभागी झाले होते, असंही ईडीचं म्हणणं होतं. मात्र सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आल. तर दुसरा बोली लावणारा बारामती अग्रोचा व्यावसायिक सहकारी होता, ज्याला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, असंही ईडीने नमूद केलं होतं. अखेर शुक्रवारी रोहित पवार यांनी वकील कुशल मोर यांच्यामार्फत सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश महेश जाधव यांच्या समोर दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला. याप्रकरणात आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने ईडीला 17 मार्चपर्यंतचा वेळ दिला आहे. ईडीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून रोहित पवार यांना दिलासा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ