Solapur : सोलापूरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, सात गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड, लाखो रुपयांचं उत्पन्न

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी केला आहे. त्यांना केवळ सात गुंठे क्षेत्रावर पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर शेतकऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करावी असं त्यांनी सांगितले आहे.

Solapur : सोलापूरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, सात गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड, लाखो रुपयांचं उत्पन्न
karmala
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 04, 2023 | 12:20 PM

करमाळा : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (karmala) तालुक्यातील उजनी धरणाच्या (Ujani Dam) कुशीत शेतीचा यशस्वी प्रयोग पाहायला मिळाला आहे. वांगी नंबर 3 येथील शेतकरी विकास वाघमोडे यांनी सात गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. त्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. करमाळा तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर शेती पाहण्यासाठी तिथं नागरिक गर्दी सुध्दा करीत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरुन शेती करुन अनेकांनी आतापर्यंत लाखो रुपये कमावल्याचे आपण पाहिले आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील वातावरण पाहता स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होणार असा लोकांचा समज होता.

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी केला आहे. त्यांना केवळ सात गुंठे क्षेत्रावर पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर शेतकऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करावी असं त्यांनी सांगितले आहे.

स्ट्रॉबेरी म्हटले की, आपल्यासमोर उभा राहतो तो सातारा जिल्हा, अन् महाबळेश्वर परिसर स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारा म्हणून हा भाग ओळखला जातो. सोलापूर जिल्हयातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी प्रतिकूल नसल्याने येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही असा समज होता. परंतु हा निष्कर्ष चुकीचा ठरवत करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचे आवाहन स्वीकारत ही शेती यशस्वी करून आपल्या सात गुंठे क्षेत्रामध्ये पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. सात गुंठे क्षेत्रात 4 हजार रोपांची लागवड केली होती. यासाठी 1 लाख 13 हजार रुपये खर्च झाला होता. तर त्यातून त्यांना पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेती करीत असताना अनेक प्रयोग केले आहेत. त्यासाठी त्यांनी विविध कृषी प्रदर्शनं पाहली आहे. त्याचबरोबर शेतीच्या तज्ज्ञांच्या साहाय्याने शेती केली आहे. पारंपारिक शेती करीत असताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.