Parli : बेरोजगार तरुण शेतकऱ्याची यशोगाथा, आधुनिक शेतीची आयडीया कामी आली, पाच कोटी रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता

| Updated on: Jan 29, 2023 | 1:55 PM

लागवड करून दोन वर्षांचा अवधी झाला आहे. अद्याप याचे उत्पादन निघण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी आहे. परंतु ज्ञानेश्वरने याच चंदनात पेरूची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

Parli : बेरोजगार तरुण शेतकऱ्याची यशोगाथा, आधुनिक शेतीची आयडीया कामी आली, पाच कोटी रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता
chandan farming
Image Credit source: tv9marathi
Follow us on

परळी : परळी तालुक्यातील कन्हेरवाडी (Parli kanherwadi) इथल्या एका बेरोजगार तरुणाने, आधुनिक शेतीची कास धरत चंदन शेतीला (chandan farming) सुरुवात केली आहे. चंदनाचं उत्पादन निघण्यास अद्याप अवधी असला तरी इतर अंतर पिकातून (crop) त्यांना आर्थिक नफा चांगला मिळत असल्याचे तरुणाने सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने केलेल्या शेतीचं परळीत सगळीकडे कौतुक आहे. चंदनाच्या शेतीमधून तरुणाला पुढच्या वर्षी पाच कोटी रुपयांचं उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्ञानेश्वर फड याने बीएससी आयटीआय शिक्षण घेतलं आहे. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्याने वडिलोपार्जित शेती करण्याला पसंती दिली. वडोलोपार्जित सात एकर शेतीतील एक एकरवर त्याने चंदनाची लागवड केली आहे. लागवड करून दोन वर्षांचा अवधी झाला आहे. अद्याप याचे उत्पादन निघण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी आहे. परंतु ज्ञानेश्वरने याच चंदनात पेरूची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

चंदनाची लागवड करणे सोपे असले, तरी त्याची निगा राखणं कठीण असतं त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण शेती सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आणण्याचा ज्ञानेश्वरचा प्रयत्न आहे. चंदनाच्या एका झाडापासून पंधरा किलो चंदन निघते, सध्या बेंगलोरच्या बाजारपेठेत आठ हजार रुपये प्रति किलो दर आहे. हाच दर कायम राहिल्यास ज्ञानेश्वरला सहा हजार किलो चंदनाचे उत्पादन अपेक्षित असून त्यातून किमान पाच कोटी रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता आहे अशी माहिती ज्ञानेश्वर फड या तरुण शेतकऱ्याने दिली.