AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यधुंद तरुण-तरुणीने नको ते केलं! महिला पोलिसाच्या हातालाच चावली अन्… बाणेरमध्ये रात्रभर गोंधळ

पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने महिला पोलीसाच्या हाताचा चावा घेतला आहे. तसेच तरुणाने देखील नको ते केलं...

मद्यधुंद तरुण-तरुणीने नको ते केलं! महिला पोलिसाच्या हातालाच चावली अन्... बाणेरमध्ये रात्रभर गोंधळ
सांकेतिक फोटोImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 06, 2026 | 11:57 AM
Share

दारुच्या नशेत लोक काय करतील याचा नेम नसतो. अनेकदा सोशल मीडियावर तरुणांचे मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधीकधी तर मद्यधुंद अवस्थेत तरुणांच्या हातून मोठे गुन्हे देखील घडत असतात. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. दारूच्या नशेत भान हरपलेल्या एका तरुण-तरुणी जोडप्याने पोलिसांवरच हात उचलल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात दोघांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटना काय घडली?

३ मार्च ते ४ मार्च २०२६ या रात्री पुण्याच्या बाणेर परिसरात बालेवाडी येथील ‘एजंट जॅक’ या बारमध्ये २४ वर्षीय मानसी चंपलाल परिहार्या आणि तिचा मित्र २४ वर्षीय युवराज नीलेश परतानी पार्टीसाठी गेले होते. मद्यपानानंतर त्यांचा बारमध्येच कोणाशी तरी वाद झाला. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीच पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याच्या मागणीवरून त्यांनी बारमध्ये गोंधळ घातला.

नंतर पोलिसांनी दोघांना अधिक चौकशीसाठी बाणेर पोलीस ठाण्यात आणले. तिथेही त्यांची अरेरावी सुरू राहिली. वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचे सांगितल्यावर मानसीने एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या युनिफॉर्मला हात लावला, शिवीगाळ केली आणि त्यांच्या उजव्या हातावर चावा घेतला. त्याचवेळी युवराजने पोलिसांना “तुमची नोकरी घालवून टाकीन” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. मानसीने तर “मी सुसाईड करून तुमची नावे लिहून ठेवीन” अशी धमकी देऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

काय कारवाई झाली?

या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याच्या गंभीर कलमांखाली बाणेर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाथरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दारूच्या नशेत कायद्याला हाताशी धरणाऱ्या या दोघांच्या कृत्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी बार परिसरातील सुरक्षा आणि पोलिसांची सजगता अधिक वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...